पुस्तकपरिचय पंडित-सुधारक : श्री. म. माटे (1006-1957)
प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा …